औरंगाबादमधील पोलिसाचा ठाण्यात मृत्यू; फूटपाथवर मिळाला मृतदेह

ठाणे – ठाणे शहरात पोलिस कर्मचाऱ्याचा फूटपाथवर मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसाचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत पोलिस कर्मचारी औरंगाबाद येथील पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत होते.

बळीराम मोरे, वय 40 वर्ष असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव होते. बळीराम मोरे हे ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील एका फूटपाथवर आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाणे पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांशी संपर्क करत माहिती मिळवली असता बळीराम मोरे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते सीक लिव्हवर असल्याचे औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

ठाणे पोलिसांच्या बिट मार्शल टीममधील पोलीस नाईक महाले आणि थविल यांना बळीराम मोरे हे फूटपाथवर आढळून आले होते. दरम्यान बळीराम मोरे हे रजेवर असल्याने ते ठाण्यात कसे आले आणि फूटपाथवर त्यांचा मृतदेह कसा आढळून आला हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.