Aurangabad lockdown | औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊन; वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्णय

औरंगाबाद – करोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे औरंगाबाद प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात 11 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत अंशत: लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा लाॅकडाऊन 11 मार्च ते चार एप्रिलपर्यंत राहणार आहे. दर शनिवारी व रविवारी पूर्णपणे शहर बंद राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान, शाळा महाविद्यालये बंद असणार आहेत. (10 वी, 12 वी वगळता), हाॅटेल, बार रात्री 9 नंतर बंद असणार आहेत. सभा, मोर्चे, आंदोलनाला बंदी. लाॅनवरील लग्न सोहळ्यांना बंदी असणार आहे. तसेच जाधववाडी भाजी मार्केट आठवडाभर बंद असणार आहे.

शहरात दिवसेंदिवस नवीन रूग्णसंख्येत वाढ –
दरम्यान, औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढत होत आहे. औरंगाबादमध्ये काल दिवसभरात तब्बल 440 कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 52 हजार 543 वर पोहोचला आहे. औरंगाबादेत आतापर्यंत 48 हजार 295 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1289 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.