धक्कादायक! जिवलग मित्रानेच केला मित्राचा खून; औरंगाबाद येथील घटना

औरंगाबाद – औरंगाबाद येथील संजय नगर भागात जिवलग मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगेश मालोदे (वय 30) याचा खून झाला आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृत मंगेश हा एका खाजगी कंपनीत काम करीत होता. परिसरातच राहणा-या भु-या सोबत त्याची मैत्री होती. 21 जुलैला दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र त्या नंतर भु-याने मंगेशच्या घरी जाऊन त्याची आणि त्याच्या कुटूंबियांची माफी मागितली होती. त्यानंतर दोघामध्ये पुन्हा मैत्री झाली.

गुरुवारी रात्री मंगेश गल्लीत बसला असताना भु-या त्याच्या आईसोबत जात होता, त्यावेळी पुन्हा दोघामध्ये बाचाबाची झाली. त्यात मला आईसमोरच बोलला म्हणून भु-याचा राग अनावर झाला आणि त्याने चाकूने मंगेशला भोसकले. त्यात मंगेश गंभीर जखमी झाला. मंगेशला लोकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत मंगेशचा मृत्यू झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.