हे कोणत्या चित्रपटाचे नाव नाही. मध्यंतरी शाहरूख आणि आलियाचा असाच एक चित्रपट आला होता. त्याचेही नाव असेच काहीसे हॅरि मेट सॅली की काहीतरी होते. मात्र ते वेगळे.
आताचे ऑरा आणि आयटम वेगळे आहेत. ही श्वानांची नावे आहेत. यातील ऑरा ही कुत्री तर आयटम हा कुत्रा आहे. ही स्टार मंडळींची अपत्ये आहेत. कारण त्यांचे मालक अथवा मालकिणी स्वत:ला पेटमॉम म्हणवतात.
ऑराची पेटमॉम आहे रश्मिा मंदाना तर आयटमची आहे चार्मी कौर. यातील रश्मिकाला नॅशनल क्रश डिक्लेअर करून टाकले असल्यामुळे ही बाबा कोण असा प्रश्न कोणाला पडणार नाही.
कोणाला चुकुन तसा प्रश्न पडलाच असेल तर रश्मिका साउथमध्ये सध्या सगळ्यांत तेजीत चालणारे नाणे आहे. तिची लोकप्रीयता इतकी प्रचंड वाढली आहे की बॉलिवुडवाल्यानी थेट पायघड्या घालून तिला आमंत्रण दिले. येथील काही चित्रपटांत आता ती काम करणार आहे.
त्यातला एक आहे साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा गुडबाय. याच्या शूटींगसाठी रश्मिका सध्या हैदराबादहून मुंबईला आहे. चार्मि कौरही एक चित्रपट काढते आहे. त्याचे नाव आहे लायगर. यात रश्मिकाचा फेव्हरीट हिरो विजय देवराकोंडा नायक आहे. त्यामुळे चार्मीही मुंबई मुक्कामी आहे.
तर या दोघींची भेट मुंबईत झाली त्यावेळी त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्यासोबत ऑरा आणि आयटमही होते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघांची फोटोसकट एन्ट्री झाली आहे. श्वान अनेक असतात. पण मोठ्या घरचे श्वानही स्टार असतात. आता त्यांची नावे सगळ्यांना लक्षात राहतील.