नगर – भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडून दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही धमकी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांना फोनवरून दिल्याची एक क्लिप सोशल मिडियावर फिरत असून त्यावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या क्लिपची चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे.
गुन्हा दाखल होईल, आम्हाला काही फरक पडत नाही. गावात लक्ष घालू नका अनाही तर पाहवे लागले. अशा शब्दात शिवाजी कर्डिले यांनी समोर असलेल्या सुवेंद्र गांधी यांना सुनावले असल्याचा ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे नगर शहरास जिल्ह्यात चांगलीच खळबळ डडाली आहे.
ही क्लिप आपण स्वतःहून व्हायरल करण्याचे ऍड. अभिषेक भगत यांनी पोलिसांकडे स्पष्ट केले आहे. ही ऍड. फिर्याद भगत यांनी दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत. ही क्लिप कुणाची आहे. की व्हायरल केली, त्या क्लिपमधील आवाज कुणाचा आहे. सुवेंद्र गांधी यांच्या नावाचा उल्लेख असल्याने त्यांना म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आलेले आहे. त्यांनी अद्याप आपले म्हणणे सादर केलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने भाजपच्या एका नेत्याच्या मुलाला केलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपमध्ये देखील याबाबत खळबळ डडाली असून याबाबत भाजपच्या नेत्यांनी मौन पाळले आहे.