‘तुला पाहते रे’ मालिका येत्या जुलैपर्यंत घेणार प्रेक्षकांचा निरोप

छोट्या पडद्या वर सध्या ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडली. मालिकेला सुरुवाती पासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी.चे उच्चांक गाठत आहे. मात्र ही मालिका लवकरच संपणार असल्याची माहिती सुबोध भावे यांनी वृत्तपत्राला दिली.

वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार,‘येत्या जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार आहे. मालिकाची कथा एवढीत होती. त्यात उगाच ओढून ताणून खतपाणी घालून कथा वाढवणार नाही हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे काही रंगतदार वळणांनंतर जुलैपर्यंत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल’ अशी माहिती सुबोधनं वृत्तमाध्यमांशी बोलताना दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)