Atul Parchure | मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. त्यांनी 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी दु:ख व्यक्त केले. आज सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. Atul Parchure |
अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. पण आज त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली.
अतुल परचुरे यांचा प्रवास
अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केलं. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले. Atul Parchure |
परचुरे यांनी साकारलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. पु. ल. देशपांडे यांच्यासमोर त्यांचीच व्यक्तिरेखा ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात उत्तम पद्धतीने साकारली. त्यांचा ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा शेवटचा चित्रपट होता. Atul Parchure |
हेही वाचा:
आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार? ; ‘हे’ मोठे संकेत मिळाले