मुंबई – भाजपा नेते अतुल भातखळकर हे महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यावेळी त्यांनी ट्विट करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे.
‘राज्यात रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही’ या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर भातखळकर यांनी टीका केलीय. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगातून जामिनावर बाहेर आलेले छगन भुजबळ अलीकडे खूपच विनोदी बोलतात, असे म्हणत भातखळकर यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय
BIG NEWS: विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादीकडून खडसेंना उमेदवारी
काय म्हणाले होते छगन भुजबळ –
राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इगतपुरीच काय तर राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजर खपवून घेतला जाणार नाही. कुणीही कारवाई पासून वाचणार नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना केले होते.
उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना ओपन चॅलेंज; म्हणाले, ‘हिम्मत असेल तर…’