मुंबई – ड्रग्ज केस प्रकरणी मागील 26 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला आहे.
सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी मन्नतवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जमीन मिळाल्यानंतर सुद्धा कोर्टाची ऑर्डर मिळाली नसल्याने आर्यनला कालची आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली आहे. आज आर्यन आर्थर रोड जेलमधून आपल्या घरी येणार आहे.
आपला मुलगा आर्यन घरी येणार म्हंटल्यावर मन्नतवर रोषणाई करण्यात आली आहे. याच कारणामुळे शाहरुखचा बंगला मन्नतची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. मन्नतमधील शाही थाट, घरातील सजावट पाहून अनेक लोक या बंगल्याच्या प्रेमात पडलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा बंगला 6000 स्वेअर फुटामध्ये पसरलेला आहे.
शाहरुख खानने हा बंगला 2001 मध्ये बाई खोर्शेड भानू संजना ट्रस्टकडून भाडेतत्वावर घेतला होता. त्यानंतर शाहरुख खानने या बंगल्याचे नाव मन्नत ठेवले. मन्नत बंगल्यात एकूण पाच बेडरुम आहेत. या बंगल्याच्या समोर समुद्र आहे.
आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. सकाळी 9 वाजेनंतर आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती आहे. स्वतः शाहरुख खान आणि गौरी खान आर्यनला घरी आणण्यासाठी आर्थर रोड जेलकडे रवाना झाले आहे.