न्यूयॉर्क – दिवाळीनिमित्त न्यूयॉर्कच्या एम्पायर बिल्डिंगला विशेष रोषणाई करण्यात आली आहे.मॅनहटनमधील या प्रख्यात इमारतीला न्यूयॉर्क, न्यूजर्सी येथील भारतीयांच्या संघटना आणि फेडरेशन ऑफ इंडियन असोशिएशन या संघटनांनी एकत्रितपणे ही रोषणाई केली आहे.
त्यासाठी खास नारंगी दिवेही तेथे लावण्यात आल्याने ही इमारत आता खूपच उठून दिसत आहे. त्यावर पूर्ण दिवाळीचा माहोल दिसतो आहे. भारतीय संस्कृतीबरोबरच भारतीय खाद्य पदार्थांचीही चव येथील आंतरराष्ट्रीय समुदायाला चाखता यावी, यासाठी येथे दहा हजार जणांना मेजवानीही देण्यात आली. दिवाळी सूप ऍन्ड किचन ही संकल्पना त्यासाठी राबवण्यात आली.
भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा
फेडरेशन ऑफ इंडियन असोशिएशनचे अध्यक्ष अंकुर वैद्य यांनी ही संकल्पना राबवून ही मेजवानी दिली. या उपक्रमाचे भारतीय राजनैतिक अधिकारी रणधीर जयस्वाल यांनी स्वागत केले.