मसूर- मसूर (ता. कराड) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा उद्या रविवारपासून (दि. ५) सुरू होत असून रविवारी छबिना, तर सोमवार दि. ६ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे, अशी माहिती श्री भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात भरत असून यावर्षी रविवारी सायंकाळी ७ वाजता श्रींची मिरवणूक म्हणजे,
छबीना निघणार असून सोमवारी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत तानाजीराव भोसले यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. त्यानंतर मसूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या मैदानावर नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. विजेत्यांना इनाम रुपये १०० ते १ लाखापर्यंत कुस्तीचे इनाम ठेवण्यात आले आहे.
कुस्ती मैदानाची उदघाटक म्हणून श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, मुंबई महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड,
मसूरचे सपोनी विठ्ठल शेलार, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, मसूर पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष वैभव गुरव, उपाध्यक्ष सोमनाथ भांडवले, खजिनदार, महेश जगदाळे उपस्थिती आहे.
यावेळी युवराज जगदाळे प्रकाश पुजारी, दत्ता माने, सचिन जगदाळे, दिलावर मुल्ला, शिवाजी माने, राहुल जगदाळे, सतीश पाटील, पै. इंद्रजीत तनपुरे, देवस्थान पंच गोविंदराव जगदाळे, बापूसाहेब जगदाळे, विकास जगदाळे यांच्यासह सर्व यात्रा कमिटीचे व देवस्थान समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहान यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.