नांदेड : नांदेडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या इथे ५६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, काही भागांमध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यातच आता नांदेड जिल्ह्यात लग्न समारंभासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा पर्याय प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यासाठी जवळच्या पोलिस ठाणे व स्थानिक स्वराज्य संस्थेला माहिती देणे बंधनकारक, हॅण्ड वॉश, सैनेटायझर, मास्क बंधनकारक, सामाजिक अंतर राखणे आवश्यक, अगोदर आणि नंतर परिसर निर्जंतुक करणे अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जारी केले आहेत.