जळगाव: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. भुसावळ भाजपा अध्यक्ष निवडीच्या बैठकीत हा प्रकार घडला. भाजपमधील अंतर्गत वाद मिटण्याचे चिन्हे दिसत नसून भाजप कार्यकर्तेच आपआपसात भिडले आहेत. या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आली.
भाजपने भुसावळ भाजपा अध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजपचा दुसरा गट शिरला आणि राडा करण्यास सुरुवात केली. त्यांनी व्यासपीठावर शाई देखील फेकली. सुनील दवे यांनी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना मनमानी केल्याचा आरोप सदर गटाने केला. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण भाजप कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.