पाकमध्ये हाफीज सईदच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न

भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉवर लष्कर-ए-तोयबाचा संशय

लाहोर : मोस्ट वॉंटेड दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातून थोडक्‍यात बचावला आहे. शनिवारी संध्याकाळी एका सभेमध्ये तल्हा सईदला बॉम्बस्फोटामध्ये ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्‍या हाफिज सईद मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे.

लष्करचे सात दहशतवादी या स्फोटात गंभीररित्या जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला असे फर्स्ट पोस्टने पाकिस्तानातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. लाहोरच्या मोहम्मद अली रोडवर एका धार्मिक सभेच्यावेळी हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला.

आधी पाकिस्तानने अपघाताने गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे म्हटले होते. लष्कर-ए-तोयबाने भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ वर संशय व्यक्त केला आहे. सभेच्या व्यासपीठावर दुसऱ्या वक्‍त्याचे भाषण सुरु असताना हा स्फोट झाला. तल्हा सईद त्यावेळी मंचावर उपस्थित होता.

स्फोटामध्ये मंचावरील वक्ता जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाफिज महमूद या स्फोटात ठार झाला. अहसान, अब्दुल गफूर, अबू बाकर, मुहम्मद अफाक, मुहम्मद अस्लम या स्फोटात जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.