नवी दिल्ली : देशात एकीकडे गणेश चतुर्थीचे आनंदाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे संसद भवन परिसरात एका संशयित व्यक्तीने चाकु घेऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या सावधानतेमुळे संदीग्ध व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Delhi: A person has been detained while he was trying to enter the Parliament allegedly with a knife. He has been taken to Parliament police station. pic.twitter.com/rKforH5i5R
— ANI (@ANI) September 2, 2019
आज सकाळी एक संदीग्ध व्यक्ती व्हीआयपी गेटमधून संसद भवन परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मोटारसायकलवरून आलेल्या या व्यक्तीची अजूनही ओळख पटलेली नाही. तर अटक करण्यात आलेला संशयित राम रहिमच्या नावाने नारे देत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर चौकशीनंतर संशयित व्यक्तीने आपले नाव सागर इंसा असे सांगितले असून तो दिल्लीतील लक्ष्मी नगरचा रहिवासी आहे. दरम्यान, पुढील चौकशीसाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.