मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात एका व्यक्तीने भर कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुषार शिंदे असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीच्या संपत्तीच्या वादाचं प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहित आहे.
या व्यक्तीने कोर्टातच स्वतःची नस कापण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर शिंदे यांना हायकोर्टातील पोलिसांनी ताब्यात घेतले.
वृद्ध आई-वडिलांविरोधात 55 वर्षीय तुषार शिंदे यांनी संपत्ती वादातून केस फाईल केली होती. ज्याचा निकाल आई वडिलांच्या बाजूने लागला. त्यामुळे संपत्ती हातातून गेली या निराशेत तुषार शिंदे यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी कोर्टाच्या परिसरातच धारदार शस्त्राने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्तव्यावर असेलल्या पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं आणि गंभीर घटना टळली.
तुषार शिंदे घाटकोपर येथे नातेवाईकांकडे राहतात. सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर कोर्टात एकच खळबळ उडाली.