वॉशिंग्टन : रशिया, चीन आणि इराण 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. यासाठी ते एआय तंत्रज्ञानाचा वापर करून खोटी किंवा फसवी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात असे अमेरिकेच्या सुरक्षेच्या संदर्भातील नियमित आढावा घेणाऱ्या एका संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या या अहवालानुसार, रशियन इन्फ्लूएन्सरने या संदर्भातील काम अगोदरच सुरू केले आहे. अकारण निर्माण केल्या जाणाऱ्या वादाला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांच्या कथा अतिशयोक्त सादर केल्या जात आहेत. यासाठी, त्यांनी बनावट वेबसाइट तयार करण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर केला आहे. तथापि, हा वापर अशाप्रकारे केला गेला आहे की अमेरिकेतील माध्यम अस्थापनांकडून अधिकृतपणे ही माहिती दिली जात असल्याचे भासवले जाते आहे.
अहवालानुसार, परकीय हस्तक्षेपाच्या प्रयत्नात इराणही आक्रमक झाला आहे. गाझामधील संघर्षाच्या निषेधार्थ इराणी कलाकारांनी स्वतःला ऑनलाइन कार्यकर्ते म्हणून सादर केले आहे त्यांच्याकडून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेत यापूर्वीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी बाह्य हस्तक्षेप झाल्याचा आरोप आणि प्रयत्नही झाला होता. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले होते त्यावेळी प्रथम अशा स्वरूपाच्या चर्चा झाल्या होत्या.