मीरत – इयत्ता 10 वीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या चौघा आरोपींपैकी एकाने आज न्यायालयाच्या आवारातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. तेंव्हा दोघांपैकी एकजण जखमी झाला.
लखन आणि विकास या दोन आरोपींना आजच सकाळी पकडण्यात आले आहे. त्यांना कोर्टात नेले जात असतानाच त्यांनी पोलिसांचे रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मीरत पोलीस आणि सर्व्हिलन्स डिपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकांबरोबर कापसाड गावाजवळ या दोघांची चकमक झाली. लखन याने पोलिसांवर गोळीबार केला. तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागली, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक केशव कुमार यांनी दिली. दोन्ही आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्यात आले असून, लाखनवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. तिला विषारी पदार्थ खाण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. चौघांपैकी दोघेजण अद्याप फरार आहेत.