औरंगाबाद – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असलल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून केला जात होता, असा दावा करण्यात आला आहे. पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. त्यातून हा प्रकार घडल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील होते. मात्र, पंकजा मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण शांत झाले.दरम्यान, पंकजा यांचे समर्थक कराड यांच्या गाडीवर हल्ला करणार असल्याची माहिती कराड समर्थकांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे, कराड यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. त्यावेळी कराडांच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी पंकजा मुंडे यांचे समर्थक आले. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण झाली.
त्यावेळी पोलिसांनी तातडीने पंकजा मुंडे यांच्या समर्थकाला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.तर बीडच्या केज तालुक्यातील चींचपुर येथिल हनुमान मंदिरात, हनुमान चालीसा वाचन करत भाजप पक्षश्रेष्ठींना सद्बुद्धी मिळावी यासाठी साकडेही या कार्यतर्त्यांनी घातले आहे. त्याचबरोबर, पंकजा मुंडे यांनी आदेश दिला तर रस्त्यावर उतरू असा इशारा देखील यावेळी मुंडे समर्थकांनी दिला आहे.