जम्मू- पुलावामा हल्ल्याच्या दुसऱ्या स्मृतिदिनी सुरक्षादलाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट रचला होता. जम्मू बस स्टॅंडवरुन सुरक्षादलाने रविवारी जवळपास 6 किलो स्फोटके अर्थात इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस जप्त केले. सुरक्षादलाने संपूर्ण बस स्टॅंडवर सर्च ऑपरेशन केले. पोलिसांनुसार पाकिस्तानचा सपोर्ट करणारी दहशतवादी संघटना अल बद्रने पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या स्मृतिदिनी हा ब्लास्ट करण्याचा कट रचला होता.
जम्मू पोलिस आयुक्त मुकेश सिंह यांनी सांगितले की, 3 दिवसांपासून पोलिस अलर्ट होते. माहिती मिळाली होती की, पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनी दहशतवाही संघटना काही तरी मोठे करण्याचा प्लान करत आहे. या वेळी स्फोट हा जम्मूमध्ये होणार होता. शनिवारी रात्री आम्ही गस्त घालताना सोहेल नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. त्याच्या बॅगमधून 6-6.5 किलो स्फोटके जप्त करण्यात आली. ही स्फोटके ऍक्टिव्ह नव्हती. सोहेलने सांगितले की, तो चंदीगडमध्ये शिकला आहे. तो पाकिस्तानमधील अल बद्रच्या आदेशानुसार स्फोटके प्लांट करण्यासाठी आला होता.
सोहेलला स्फोटके प्लांट करण्यासाठी 3-4 टार्गेट देण्यात आले होते. त्यामध्ये रघुनाथ मंदिर, बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन आणि लखदाना बाजार या ठिकाणांचा समावेश होता. यानंतरर तो श्रीनगरला जाणार होता. तिथे अल बद्रचा अख्तर शकील खान नावाचा एक ग्राउंड वर्कर त्याला घ्यायला आला असता. यानंतर सोहेल त्याच्यासोबत ऍक्टिव्ह झाला असता.
या कटाची माहिती चंदीगडचा एक तरुण काजी वसीमला होती. त्यालाही पकडण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा अजून एक साथीदार आबिद नबीलाही अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सांबाच्या झांग येथून 6 पिस्तूल आणि 15 छोटी स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.