मुकूंदनगरमध्ये खुनाचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा

नगर- नातेवाईकांच्या प्लॉटमधून सामान घेऊन जात असताना अडविल्याचा रागातून तिघांनी युवकाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुकुंदनगर येथील मरियम मजस्जिदसमोर रविवारी (दि.5) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी भिंगार कॅंम्प पोलीस ठाण्यात रहीम, फैसल शेख, उसाची टपरी चालवणारा (तिघांचीही पूर्ण नावे माहीत व पत्ता नाही) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत तौफिक सफिक शेख (वय 21, रा. मुकूंदनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी दुपारी रहीम व इतर काहीजण तौफिक यांच्या नातेवाईकांच्या प्लॉटमधून साहित्य घेऊन जात होते. त्यांना तौफिक यांनी अडवले. त्यामुळे रागाविलेल्या तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यास सुरुवात केली. उसाचे टिपरे व टणक वस्तूचा डोक्‍यात जोराचा फटका लागून गंभीर दुखापत झाली आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या तौफिक यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.