खून करून एच.ए.मैदानावर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

पिंपरी – पिंपरी येथे तरुणाचा डोक्‍यात दगड घालून खून करत मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.21) सकाळी पिंपरी येथील एच.ए.मैदानावर घडला आहे. अजय राजेश नागोसे (वय-19 रा. गांधीनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनी नियत्रंण कक्षाला फोन केला त्यानुसार पिंपरी पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले यावेळी मृतदेहातून धूर निघत होता.

यावेळी पोलिसांनी पाणी ओतून ती आग विझवली. सुरुवातीला मुलगी असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला मात्र मृतदेहाचे निरीक्षण केले असता तो तरुण असल्याचे समोर आले. पोलिसांना घटाना स्थाळावरून मिळालेल्या साहित्यावरून तरुणाची ओळख पटली. अजय हा एच.ए. कंपनी येथील कॅनटीनमध्ये कामाला होता. तो शनिवारी (दि.20) दुपारी कामावर गेला होता. त्याचे कोणाशी भांडण होते का की काही इतर कारण या खूनामागे होते याचा पिंपरी पोलीस तपास करीत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.