पुणेः अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. सैफला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सर्जरी केल्यानंतर त्याला डॅाक्टरांनी ५ दिवसांनंतर रुग्णालयातून डिसार्च दिला. त्यानंतर संजय निरुपम यांनी एवढ्या लवकर डिसार्च कसा दिला असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वतःच चाकू मारून घेतला की काय, अशी शंका असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले. आळंदीतील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित हिंदू महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
बांगलादेशी अगोदर नाक्यावर उभे राहत होते. आता घरात घुसायला लागले आहेत. भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जय श्रीराम म्हणणाऱ्यांच्या घरात घूसून मारण्याचे प्रकार घडले आहेत. हिंदू समाज म्हणून एकत्र राहून जशास तसे उत्तर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राणे यांनी केले. हिंदू राष्ट्रातील धर्मस्थळावर अतिक्रमणे केली जात आहेत. भविष्यात आळंदीकडेही वाकड्या नजरेने पाहतील. त्यासाठी हिंदू समाजाने दक्ष राहिले पाहिजे, असे देखील ते यावेळी म्हणाले. काँग्रेसवर देखील त्यांनी यावेळी टीका केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे रक्त भगवे
राज्यात भगवे सरकार बसवले आहे. येणाऱ्या काळात राज्यात एक कत्तलखान ठेवणार नाही. हिंदूंना त्रास झाल्यास अधिकारी पाठीशी उभे राहतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे रक्त लाल नसून भगवे असल्याचे राणे यावेळी बोलताना म्हणाले. आपल्या राज्यात हिरवे गुलाल उधळून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. पण हिंदूंनी विधानसभेत उत्तर दिले आणि राज्यात भगवे सरकार बसवले.