नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या बाहेर तोडफोड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने आज भाजप कार्यकत्यांवर ही तोडफोड केल्याचा आरोप केला आहे.मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप आंदोलकांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली.
यावेळी भाजपा आंदोलकांनी म्हटले की, या आंदोलनात महिलासुद्धा सहभागी आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे ज्या ठिकाणी महिला आंदोलनासाठी बसल्या आहेत नेमके तिथेच लावण्यात येत होते. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे आंदोलक महिलांसाठी अडचणीचे झाले होते. मात्र, आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे तोडले नाही. तर हे कॅमेरे लावण्यास मनाई केली.
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनीही असा आरोप केला आहे की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या प्रॉपर्टीचे नुकसान केले आहे, सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत.
या अगोदर भाजप आंदोलकांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही हल्ला केल्याचा भाजप आंदोलकांवर आरोप आहे.