छपरा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ‘जेएनयू’चे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन वाहनांचे नुकसान झाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात ते आज सारण जिल्ह्यातील विमानतळ मैदानावर जाहीर सभा घेणार होते.
कोपा पोलिस स्टेशन परिसरात हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या ताफ्यातील तीन वाहनावर देखील हल्ला झाला असून काही लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.