नवी दिल्ली – पाकिस्तानमधील ननकाना साहिब गुरुद्वारावर कथित लोकांनी दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. भारताने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच शिखांच्या सुरक्षिततेची मागणी केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने या वृत्ताचे खंडन केले असून गुरुद्वारा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हंटले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, याठिकाणी मुस्लिम समूहाच्या दोन गटामध्ये वाद झाला. मात्र, यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुरुद्वारा पूर्णपणे सुरक्षित असून कोणतेही नुकसान झालेले नाही. तसेच पाकिस्तान सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि विशषेतः अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे, असेही प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानच्या या घटनेवरून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानमध्ये आपल्या शीख बंधूंना धमकी दिली जात आहे. अल्पसंख्यकांवर अत्याचार होतात यासाठी काँग्रेसवासियांना अजून कोणता पुरावा पाहिजे? असे संबित पात्रा म्हंटले आहे.
“ननकाना साहिब में एक भी सिख़ ना रहने देना …इस्लाम के नाम पे”
यह धमकी दी जा रही थी पाकिस्तान में हमारे सिख़ भाइयों को …इन कांग्रेसियों को “Minority Religious Persecution” का और सबूत चाहिए?
@RahulGandhi , @priyankagandhi आप के लिए ये सबूत काफ़ी है या और चाहिए? pic.twitter.com/FdzdvVKqpc— Sambit Patra (@sambitswaraj) January 4, 2020
तसेच केंद्रीय मंत्री हरिदिप सिंह पुरी यांनी म्हंटले कि, पाकिस्तानमधील घटना का कायद्याला विरोध करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे.
Union Minister Hardeep Singh Puri on mob attacked Nankana Sahib Gurudwara in Pakistan y’day: These are wanton acts of vandalism,arson and stone pelting against one of the holiest Sikh shrines. If any more proof was needed on the state of minorities in Pakistan then this is it. pic.twitter.com/CiOLbWBnPA
— ANI (@ANI) January 4, 2020
Vandalism, stone pelting & acts of descrecation at the holiest of holy Sri Nankana Sahib Gurudwara yesterday should be an eye opener for those who refuse to recognize religious persecution of minorities in Pakistan & the rationale behind CAA. pic.twitter.com/3dNqX33jbf
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) January 4, 2020