‘हल्ला करणं आमच्या संस्कृती आणि संस्कारात बसत नाही’

दर रविवारी कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची सक्ती

सिंधुदुर्ग – कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या १९ समर्थक आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २० हजार रूपयांचा जामीन मंजूर करण्यात आला असून कणकवली पोलिस ठाण्यात दररविवारी हजेरी लावण्याची सक्ती केलीय. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करायचा नाही अशी सक्त ताकीत देऊन मुक्तता केली आहे. दरम्यान, आमदार नितेश राणेंना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर झाल्यानंतर बाहेर येताच माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणाबाबत आपली बाजू मांडली आहे. तसेच ऑडिओ क्लिप ट्विटद्वारे शेअर केला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की,’जनतेच्या आदेशावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जेव्हा मी आमदार म्हणून निवडून गेलो, तेव्हा मी एक शपथ घेतली होती. मी माझ्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा करील, असे मी त्यावेळी म्हटलं होतं. कोणालाही मारणं, कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती आणि संस्कारात बसत नाही. आजही मला वाटतं, महाराष्ट्रातील सर्व अधिकारी वर्गाला मी सांगू इच्छितो की, तुम्ही प्रामाणिकपणे काम केलंत. तुम्ही जनतेची सेवा केलीत, ज्यासाठी तुम्हाला ही खुर्ची आणि पद दिलं आहे. तर अशा पद्धतीची आंदोलन कुठेही होणार नाहीत.’ असेही ते म्हणाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.