- कोट्यवधी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त
- दिवे गावातील कंपनीवर कारवाई
- जुहू एटीएसने टाकला छापा
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे गावातील एका कंपनीवर दहशतवादी प्रतिबंधात्मक पथकाने छापा टाकून कोट्यवधी रूपये किंनतीचे मेफेड्रोनसारखे अंमली पदार्थ आणि तो बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला.
सुमारे साडेदहा किलो मेफेड्रोन या कंपनीतून जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत किंमत चार कोटी 20 लाख रूपये आहे. तर सुमारे एक कोटी 20 लाख रुपयांच्या किमतीचा कच्चा माल जप्त करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील दिवे गावातील अल्फा केमिकल्स या कंपनीवर हा छापा टाकण्यात आला.
हा कच्चा माल 200 किलो मेफेड्रोन बनवण्यासाठी पुरला असता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारेर 100 कोटी रुपये झाली असती. पोलिस निरीक्षक दया नायक आणि जुहू एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी डिसेंबर महिन्यात महेंद्र पाटील (वय49) आणि संतोष अडके (वय 29) यांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी बुधवारी छापे घातले.
राज्यातील तरूण मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनच्या आहारी जात आहेत. त्यामुळे एटीएसने अमली पदार्थ तस्करीची ही पाळेमुळे खणून काढण्याची मोहीम हाती घेतलीआहे. त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.