महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार

साताऱ्यातील घटना पंढरपूरच्या युवकावर गुन्हा

सातारा – तू फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर कोणा कोणाशी बोलतेस, हे घरच्यांना सांगेन, अशी धमकी देत साताऱ्यातील महाविद्यालयीन युवतीवर एका युवकाने वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात ताहीर अब्दुल मुजावर (रा. पंढरपूर जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संबंधित पीडित युवती 21 वर्षांची असून ती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ताहीर आणि संबंधित मुलीची ओळख झाली होती.

तू फेसबुक आणि व्हॉट्‌ऍपवर कोणा कोणाशी बोलतेस, हे मला माहिती असून, हा प्रकार तुझ्या घरच्यांना सांगेन, अशी धमकी देऊन त्याने वर्ये येथील परिसरात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा एकदा धमकी देऊन युवतीवर अत्याचार केला. हा प्रकार भविष्यात वारंवार घडेल, याची धास्ती वाटल्याने संबंधित पीडित मुलीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन ताहीर मुजावरच्या विरोधात तक्रार दिली. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुजावरचा शोध घेतला. मात्र, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पुढील तपास पोलीस हवालदार रजपुत करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.