चाकण परिसरात एटीएम बॉम्ब ब्लास्टकरून चोरी; बॉम्ब ब्लास्टने परिसर हादरला

शिंदे वसुली (पुणे) – काल रात्री मध्यरात्री ३ च्या सुमारास भांबोली (ता.खेड) येथील चाकण व वासुलीफाटा रस्त्यालगत असलेल्या दोस्ती‌ हॉटेल च्या शेजारील हीताची कंपनीचे एटीएम मध्यरात्री २-३० ते ३ च्या दरम्यान स्फोट घडवून फोडले.स्फोटाचा आवाज ऐकून घराबाहेर आलेल्या एका व्यक्तीने गावच्या पोलीस पाटलांकरवी महाळूंगे पोलीस स्टेशनला खबर दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व त्यांची टीम सकाळीच घटनास्थळी दाखल. बॉम्ब शोधक पथकाचीही कार्यवाही सुरु.

मिळालेल्या माहितीनुसार रात्री तीन च्या सुमारास भांबोली फाट्यावरील ‘हिताची’ कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरांनी एटीएमचे शटर फोडून मुख्य मशीनला स्फोट करुन फोडले. किती रक्कम चोरीला गेली याची बॅंकेचा डाटा आल्यावर समजेल.एटीएम रस्त्यालगतच असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. रस्त्यावरील वहातुक काही काळ जाम झाली होती.

प्राथमिक माहिती नुसार एटीएम फोडणारे तीन जण असावेत. एटीएम मध्ये काही नोटा पडल्याचे दिसत होते. हिताची कंपनीचे एटीएम इतरांपेक्षा अधिक सुरक्षित आणि मजबूत असते. तरीही एटीएम कसे फोडले. अशी चर्चा सुरू झाली आहे. रात्री एटीएम बंद होते. परंतु त्याला कोणी सुरक्षारक्षक नव्हता.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.