गोवा – इंडियन सुपर लीगच्या सहाव्या मोसमात अॅटलेटिको माद्रिद (एटीके) संघाने शनिवारी विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नईयन एफसीवर 3-1 ने मात करत एटीकेने ही लीग तिसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला.
एटीकेतर्फे स्पेनचा 30 वर्षीय मध्यरक्षक जेव्हियर हर्नांडेझ याने 10 व्या आणि 93 व्या मिनिटाला असे दोन तर स्पेनचाच 29 वर्षीय स्ट्रायकर एदू गार्सिया याने 48 व्या मिनिटाला एक गोल करत संघास विजय मिळवून दिला. चेन्नईयनचा एकमेव गोल नेरीयूस वॅल्सकीस (69 व्या मिनिटाला) याने केला.
This is how it feels to be a part of the most successful club in #HeroISL history ?@ATKFC ⚪?#HeroISLFinal #LetsFootball #TrueLove pic.twitter.com/BMZalnf036
— Indian Super League (@IndSuperLeague) March 14, 2020
हा सामना करोना विषाणूच्या धोक्यामुळे प्रेक्षकांविना खेळविण्यात आला होता. या विजयासह एटीकेने एएफसी कपमध्ये स्थान मिळविले आहे.