नवी दिल्ली – डेविड विलियम्सच्या दोन गोलच्या जोरावर एटीके एफसीने इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेंगळुरू एफसी 3-1 असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
In front of their home faithful, @ATKFC have turned it around to reach their 3⃣rd #HeroISLFinal ?#ATKBFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/si4CpeQbA1
— Indian Super League (@IndSuperLeague) March 8, 2020
एटीके संघाकडून डेविड विलियम्सने 63 व्या आणि 79 व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर रॉय कृष्ण याने 30 व्या मिनिटाला एक गोल केला. बेंगळुरूकडून आशिकने 5 व्या मिनिटाला एकवेम गोल केला.
दरम्यान, उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात एटीकेने बेंगळुरूचा 1-0 असा पराभव केला होता. आता विजेतेपदासाठी एटीके आणि चेन्नइयिन एफसी आमने-सामने असतील. येत्या शनिवारी (14 मार्च) हा अंतिम सामना रंगणार आहे.