पुणे – नीरज चोप्राने ॲथलेटिक्स खेळातील भालाफेक क्रीडा प्रकारात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले. पुणे ,गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे कै.रमेशजी दामले ॲथलेटिक्स अकॅडमीच्या खेळाडूंनी आणि क्रीडा प्रशिक्षकांनी केक आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला . भारत मातेच्या घोषणा देत नीरज चोप्रा यांच्या विजयाचा आज जल्लोष केला.
यावेळी महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव श्री. रोहन दामले आणि चंद्रशेखर आगाशे कॉलेजचे प्राचार्य डॉ.सोपान कांगणे, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ.राजश्री शिळीमकर ‘चंद्रशेखर आगाशे कॉलेजचे प्राध्यापक श्री. कुमार उपाध्याय , राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री. अंकुश घुगे , राष्ट्रीय खेळाडू श्री. धनंजय मदने ह्यांनी उपस्थित खेळाडूंना खेळाची माहिती आणि ऑलिम्पिकचा इतिहास या विषयी माहिती देऊन त्यांना खेळाचा ॲथलेटिक्स खेळाचा सराव याविषयी मार्गदर्शन केले.
भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे सुभेदार असणा-या नीरज चोप्रा ह्यांनी 87.58 मीटर लांब भाला टाकून सुवर्ण पदक पटकाविले. नीरजच्या या यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच महाराष्ट्रीय मंडळामध्ये सुद्धा उत्सव साजरा करण्यात आला.