नवी दिल्ली – उत्तरप्रदेश मधील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात पोलीस हाय अलर्टवर आहेत. तसेच कारणास्तव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण उत्तरप्रदेश हादरून गेले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या संपूर्ण प्रकरणाचा अधिकाऱ्यांकडून दर दोन तासांनी अहवाल मागववण्यात येत आहे. तर दुसरीकडे, पोलीस आता आरोपींची चौकशी करण्यास सुरवात केली आहे. माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याचसोबतच सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबतचे आतापर्यंतचे झालेल्या खुलाशांबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण प्रकणात नवीन ट्विस्ट देखील येऊ शकतो.
तिन्ही हल्लेखोर वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवासी-
लवलेश तिवारी, सनी सिंग आणि अरुण मौर्य अशी आतिक आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांची नावे आहेत. हे तिघेही हत्या करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या रूपात आले होते. तर ते तिघेही वेगवेगळ्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत.लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे. तर अरुण मौर्य हा हमीरपूर आणि सनी कासगंजचा जिल्ह्याचा रहिवासी आहे.
दोन दिवस नजर ठेवली मग हल्ला केला-
लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी सिंग हे तिघेही प्रयागराज येथील एका हॉटेलमध्ये ४८ तास खोली घेऊन थांबल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अतिक आणि अशरफच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. सतत रेकी केल्यानंतर त्यांनी खुनाचा प्लॅन तयार केला. अतिक आणि अश्रफ यांच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रसारमाध्यमं हे त्यांना माहीत होतं. यामुळेच या तिघांकडे बनावट कॅमेरे, माईक आयडी आणि आयकार्ड होते. अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.
भाटी टोळी हल्लेखोर निघाली-
आरोपी सनी सिंग यापूर्वीही तुरुंगात गेला असून तुरुंगातच तो भाटी टोळीचा प्रमुख सुंदर भाटीचा खास माणूस बनल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर सुंदर भाटीसाठी काम केल्याचा आरोपही आहे. दरम्यान, हमीरपूर तुरुंगात त्याने सुंदर भाटी याची भेटही घेतली होती. सुंदर भाटी हा देखील एक माफिया असून त्याच्यावर सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत.
तिन्ही हल्लेखोरांवर या आधीही गुन्हे दाखल-
लवलेश तिवारी – अतिकवर प्रथम गोळ्या झाडणारा लवलेश तिवारी याच्यावर गुंडगिरी आणि मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. लवलेशचे वडील व्यवसायाने ड्रायव्हर असून त्यांचे कुटुंब भाड्याच्या घरात राहते. तो बांदा कारागृहात दोन वर्षे शिक्षाही भोगत आहे.
अरुण मौर्य – अरुणवर तीनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. 2014-15 च्या GRP कॉन्स्टेबल हत्याकांडातही तो आरोपी असून या प्रकरणी अरुण मौर्यला तुरुंगात जावे लागले आहे.
सनी सिंग – सनी हा हमीरपूरचा रहिवासी असून भाटी गँगशी त्याचे संबंध आहेत. सनी सहा महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता.12 वर्षांपूर्वी त्याने घरही सोडले आहे.
पाकिस्तानशी जोडला जातोय संबंध –
अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येप्रकरणी तीन वेगवेगळ्या पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता.यामध्ये एक पिस्तुल (7.62) देशी तर दुसरे 9 एमएम पिस्तुल गिरसान आणि तिसरे 9 एमएम पिस्तुल झिगाना यांचा समावेश आहे.त्यांची किंमत 4 ते 7 लाख रुपयांपर्यंत आहे.जिगाना पिस्तुलावर भारतात बंदी आहे. तरी तो पाकिस्तानमार्गे भारताला पुरवला जातो.त्यामुळे पाकिस्तानचा संबंध या हत्याकांडाशी जोडला जातोय.
प्रयेकी10-10 लाख रुपयांची सुपारी-
दरम्यान,या हत्येसाठी तिन्ही आरोपींना प्रत्येकी १० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.परंतु ही सुपारी कोणी दिली? दिली खुलासा अद्याप झालेला नाही.