अटलबिहारी वाजपेयी यांचा अनोखा विक्रम


भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी दहा वेळा लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या. विशेष म्हणजे या दहा निवडणुकांमध्ये ते सहा वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये उभे होते. यापैकी 1957 आणि 1967 मध्ये ते बलरामपूरमधून, 1971 मध्ये ग्वाल्हेरमधून, 1977 आणि 1980 मध्ये नवी दिल्लीमधून, 1991 मध्ये विदिशामधून, तर 1991, 1996,1998,1999 आणि 2004 मध्ये ते लखनौ लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले आहेत. अशा प्रकारे सहा वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचा आणि दहा वेळा जिंकण्याचा विक्रमच जणू अटलबिहारी वाजपेयी यांनी केला. अटलबिहारी वाजपेयी हे अतिशय लोकप्रिय आणि समाज मनाशी जोडलं गेलेलं व्यक्‍तीमत्व होतं, याचाच हा सबळ पुरावा म्हणावा लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.