मोदींच्या विजयाने अटल बिहारी वाजपेयींचे ‘ते’ विधान सत्यात 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांवरील कल हाती येत आहेत. या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे. मागील २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या आहेत. भाजप जवळपास  ३४० जागांचा टप्पा ओलांडला आहे. भाजपने स्वबळावर ३०० पेक्षा अधिक जागांनी विजय मिळवला आहे. सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

भाजपच्या या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सर्वत्र विजयाचे वातावरण आहे. या विजयानिमित्त सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी भाजपला भरभरून शुभेच्छा तर काँग्रेसला जोरदार ट्रोल केले आहे. अशावेळी माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एका वाक्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अटलजी म्हणतात 
माझी एक गोष्ट लक्षात ठेवा कि, आज आमचे सदस्य कमी असल्याने तुम्ही (काँग्रेस) हसत आहेत. परंतु, असा दिवस येईल कि पूर्ण भारतात आमचे सरकार असेल. त्यादिवशी देश तुमच्यावर हसेल.

Atal Bihari Bajpayee pic.twitter.com/xlqZRK83Zz

— Manoj S Vidyarthi (@manojragni) May 23, 2019

साल १९९६ च्या निवडणुकीमध्ये भाजप १६२ जागा जिकंत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून त्यावेळी शपथ घेतली. भाजपा चार दशक सतत विरोधीपक्षात राहिल्यानंतर १९९६ मध्ये वाजपेयी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पण संख्याबळ कमी असल्याने आणि लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविण्यास भाजपाला अपयश आले. त्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवसात पडले.  त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी वरील ओली भाषणात म्हंटल्या होत्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)