रांजणी येथे गावठी कट्टा, दोन काडतुसे जप्त 

मंचर – रांजणी (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत मंचर पोलिसांनी धनंजय वाघ या आरोपीकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा एकुण 15 हजार 500 रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.

रांजणी गावच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस कर्मचारी नवनाथ नाईकडे, शिवाजी चितारे हे गस्त घालत असताना कारमळा येथे कारफाटा ते नागापूर रस्त्यावर एक इसम संशयित रित्या आढळला. पोलिसांच्या गाडीची चाहूल लागताच त्याने पळ काढला. मंचर पोलिसांनी अर्धा किलोमीटर पाठलाग करुन त्याला पकडले. तसेच विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना त्याचा संशय आला.

अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा माल आढळून आला आहे. त्याच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात चोरी आणि जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत. धनंजय वाघ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत डुंबरे, नवनाथ नाईकडे, योगेश रोडे, शिवाजी चितारे, सोमनाथ वाफगावकर, प्रशांत भुजबळ या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.