पारगाव – पारगाव येथे भीमानदी पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात दम लागल्याने बुडून मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, दापोडी येथील महिला मुलांसोबत 10 ते 15 जण सायंकाळी 7 वाजता आले होते. त्यावेळी सुरेश मात्रोबा पवार (वय 52) हे पोहण्यासाठी नदी पात्रात उतरले होते. परंतु त्यांना दम लागल्याने ते बुडू लागले.
नदीकाठावरील दोन जणांनी पाण्यात उडी मारुन त्यांना तीरावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही दम लागल्याने त्यांनीही धीर सोडला. सुरेश हे अगदी 15 फुटांवर नदीकाठावर आणत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. याठिकाणी खोल पाणी असल्याने कोणालाही त्यांना वाचविता आले नसल्याचे भानुदास शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना माहिती दिली.