बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्व कामे बंद असल्याने सध्या सोशल मीडियावर बरीच हालचाल सुरू असल्याचे दिसते. जवळजवळ सर्व बॉलीवूड स्टार्स सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. यामुळे या स्टार्स कलाकारांशी संबंधित काही चित्र किंवा व्हिडीओ सतत व्हायरल होताना दिसतात. बॉलीवूडमधील बिग बी अर्थात अमिताभ बच्चन अशाच काही कारणांमुळे चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ते आपला नातू अगस्त्य नंदासोबत वर्कआउट करताना दिसत आहे.
अमिताभ बच्चन आजकाल सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असतात. दरम्यान, त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. तो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या फोटोत 77 वर्षीय अमिताभ बच्चन आपला नातू अगस्त्य नंदा यांच्यासह आरशासमोर मिरर सेल्फी घेताना दिसत आहेत. यात त्यांच्या हातात डंबेल दिसत असून चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत. यात ते नातूसोबत व्यायाम करताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “फाईट… फाईट द फिट … फिट द फाइट …’ अमिताभ बच्चन आणि त्यांचा नातूची ही स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली आहे. अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनचा मुलगा आहे.