करोना व्हायरसमुळे लॉकडाऊनदरम्यान दूरदर्शनवर जुन्या मालिकांचे पुर्नप्रसारण करण्यात येत आहे. यात “रामायण’ या धार्मिक मालिकेने पुन्हा आपली क्रेझ कायम असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच सोशल मीडियावरही लोक “रामायण’ पाहिल्यानंतर त्यांचे जुने दिवस आठवत आहेत. याशिवाय “रामायण’ संबंधित अनेक जुन्या कथाही खूप व्हायरल होत आहेत. यात एक किस्सा खुद्द “रामायण’मधील दीपिका चिखलिया (सीता) हिने शेअर केली होती.
दीपिका चिखलियाने रामायणाशी संबंधित बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. पण एका जुन्या मुलाखतीत तिने रामायणच्या पहिल्या शूटबाबत सांगितले होते की, जेव्हा मी या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली तेव्हा मी साधरण पंधरा वर्षांची होती. त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की आम्ही एक नवीन इतिहास घडवणार आहोत.
दीपिकाने सांगितले की, रामचरित मानसात तुलसीदास यांनी राम आणि सीतेला जे साकारले होते, तशीच आम्ही तयारी केली होती. तसेच टीव्हीवर पहिल्यांदाच रामायण दाखवले जाणार होते. त्यावेळी टीव्ही मालिकांना तितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती.
पहिल्या शूटबाबत दीपिका म्हणाले- “रामायण’चा पहिला भाग 1 तासाचा होता आणि तो शूट करायला आम्हाला तब्बल 15 दिवस लागले. ज्या ठिकाणी शूटिंग सुरू होते, तेथेच सर्वजण राहत होते. तसेच तिथेच मेकअप स्टुडिओ असायचा आणि कुणीही मुंबईला परतला येत नसे.