सातारा : अबुधाबी येथून सातारा जिल्ह्यात आलेल्या एका 30 वर्षीय तरुणाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हारुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाला करोना विषाणूबाधितांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे .
या संशयित रुग्णाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, अबुधाबीवरून आलेल्या या तरुणाला केवळ संशयावरून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये.
जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्षता घेत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनीही जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.