सध्याच्या काळात ज्ञान दान मागे पडले आहे- श्रीनिवास पाटील

पुणे: “पूर्वी मर्यादित शाळा आणि मर्यादितच विद्यार्थी संख्या होती. परंतु जसजशी विद्यार्थी संख्या वाढली ताशा शाळाही वाढत गेल्या, त्याबरोबरच अभ्यासक्रम, विषय आणि गरजाही वाढत गेल्या. या वाढलेल्या गरजा सरकारकडून पूर्ण करणे शक्य होत्र नसल्याने खाजगी कारणाचा उदय झाला. परंतु त्यामुळे मूळ जो हेतू आहे शिक्षण दानाचा तोच मागे पडत चालला आहे”. असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. आदर्श शिक्षण संस्था आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य टी.डी.एफ चे अध्यक्ष विजय बहाळकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, सारंग पाटील, हनुमंत भोसले, के. एस.ठोमसे, दादासाहेब पाटील,अ. ल. देशमुख, संभाजी थोरात, डी.डी.दहिफळे, शिवाजी जमाले, शरदचंद्र धारूरकर, प्रमिला गायकवाड, संजय गीते, सुनील गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोल्हापूर, सांगली मध्ये उध्दभवलेल्या परिस्थितीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आदर्श शिक्षक आणि शिक्षण संस्था यांना सन्मानित करण्यात आले तसेच, जी. के. थोरात लिखित ” बहुरूपी तांडा” या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पूर्वी खेडेगावात शाळा असणे भाग्याचे समजले जायचे. काही ठराविकच गावात शाळा असायची तिला हि इमारत नसे, अनेक ठिकाणी तर मंदिरातच शाळा भरली जात असे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक उपलब्ध असत. माध्यमिक शिक्षण घ्यायला तालुक्याला जावे लागत असे. तसेच उच्चशिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरांशिवाय पर्यायच नव्हेते. परंतु आता सध्या खाजगीकरणामुळे सगळीकडे शाळा कॉलेजेस उपलब्ध झाले आहेत. पण त्यांच्याकडून मूळ हेतूच मागे पडत असल्याची परिस्थिती आहे.

बहाळकर म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात शिक्षण क्षेत्रात अंधकार पसरणार असल्याची भीती वाटत आहे. सध्या महाविद्यालयीन शिक्षणासंदर्भात शासन जबादारी स्वीकारायला तयार नाही. हीबाब अतिशय गंभीर आहे. तसेच जर खाजगी करणालाच प्राधान्य द्द्यायचे असेल तर मग मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा कायदा कशाला काढला आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना यावेळी सपत्नीक सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन दुर्गुडे यांनी केलेले.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.