सध्या तरी भारतात बूस्टर डोसचा विचार नाही; केंद्र सरकार करोनाचे दोन डोस देण्यावरच ठाम

नवी दिल्ली : जगभरात करोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू  करण्यात येत आहे. मात्र देशात अशा कोणत्याही बूस्टर डोसची सध्या तरी गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आता आम्ही प्रत्येक भारतीयाला करोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्र देण्यावरच लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे ते लक्ष्य पूर्ण झाल्यावर बूस्टर डोस देण्याचा कदाचित केंद्र सरकार विचार करू शकेल.

अनेकांना दोन डोस देणे पुरेसे नाही. ते देऊनही त्यांच्यात कोरोना विषाणूचा सामना करण्याइतकी अँटीबॉडीज निर्माण होतील.

देशातील लसीकरणाविषयी केंद्राकडून काही गोष्टी स्पष्ट करण्यात येत आहेत. त्यात म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येकाला दोन डोस दिले जाणे याला आम्ही प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. या मोहिमेत शैथिल्य येता कामा नये. त्यामुळे आता बूस्टरचा विचार सुरू नाही, असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. पहिला डोस मिळालेल्याना दुसरा मिळण्याआधी दोन्ही मात्र घेतलेल्यांना बूस्टर देण्याची तूर्त गरज नाही, असेच केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.