मॉन्टेगामी, दि. 26 – तुफानी वादळामुळे अमेरिकेच्या अलाबामा प्रांतात मोठीच वाताहात झाली आहे. याच्या संबंधीत पडझडीच्या घटनांमुळे तेथील एकूण 8 जण मरण पावले आहेत. अनेक झाळे उन्मळून पडली असून अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. हे वादळ आता जॉर्जिया प्रांताकडे सरकले आहे. अलाबामा मध्ये जे आठ जण ठार झाले आहेत ते कलहौन प्रांतातील आहेत.
वादळामुळे झालेल्या नुकसानीचे अनेक व्हिडीओ तेथील नागरीकांनी सोशल मिडीयावर टाकले आहेत. त्यातून तेथे झालेल्या नुकसानीचा अंदाज येतो. हे वादळ ताशी 161 किमी वेगाचे होते. ते या परिसरात अनेक तास घोंगावत होते. त्याचा या प्रांतातील अनेक शहरांना फटका बसला.
वादळाचा विमानतळांनाहीं मोठा फटका बसला. तेथे उभ्या असलेल्या विमानांचे पत्रेही यातून उचकटले गेले आहेत. अनेक शहरातील नागरीकांना वीज संकटांचाही सामना करावा लागला असून तेथे बऱ्याच भागातील वीज अजून आलेली नाही.