अवघे 91 वयोमान, तरीही क्रिकेटसाठी जिवाचे रान

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचे स्थनिक क्रिकेटमधील एक खेळाडू वयाची नव्वदी पार झाल्यावरही चक्क क्रिकेटचा आनंद लुटत आहेत. सध्या या 91 वर्षांच्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा खेळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

डग क्रोवेल असे या 91 वर्षीय क्रिकेटपटूचे नाव असून, त्यांनी मोठ्या स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व कलेले नाही, पण त्यांची जबरदस्त इच्छाशक्‍ती आणि खेळाबद्दलची आवड त्यांना या वयातही क्रिकेटच्या मैदानात घेऊन आली आहे.

ऑस्ट्रेलियामधील वेटरन्स क्रिकेट ही एक अशी स्पर्धा आहे, ज्यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे खेळाडू भाग घेतात. ही स्पर्धात्मक लीग असून डग क्रोवेल 15 वर्षांपासून खेळत आहेत. 30 व्या किंवा त्याहून अधिक वयात क्रिकेट सोडणाऱ्यांसाठी ही लीग आहे. मला खेळायला आवडते आणि मी तंदुरुस्त राहतो. चेंडू आता बॅटवर तितका वेगवान येत नाही. आता चेंडू मारणे सोपे आहे कारण चेंडू मध्यम वेगातच आपल्यापर्यंत येतो, असे क्रोवेल यांनी सांगितले आहे.

डग क्रोवेल यांच्याकडे तरुण वयात व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी जास्त संधी मिळाली नाही. 1946 साली त्यांनी विंटन क्रिकेट क्‍लबची स्थापना केली. क्रोवेल यांचे क्रिकेटवर खूप प्रेम असले तरीही ते टेनिसही खेळतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.