Dimple Kapadia: अवघ्या १६ व्या वर्षी १५ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली; लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात घडलं असं काही की…
Dimple Kapadia डिंपल कापडिया यांनी अतिशय कमी वयात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांचे सौंदर्य आणि अभिनय कौशल्य पाहून प्रेक्षक त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. विशेष म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या काळात संपूर्ण बॉलिवूडमध्ये याची मोठी चर्चा झाली होती.

Dimple Kapadia: बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा गाजल्या, मात्र काही प्रेमकथा आजही लोकांच्या स्मरणात आहेत. अशाच चर्चेत राहिलेल्या प्रेमकथांपैकी एक म्हणजे अभिनेत्री डिंपल कापडिया आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रेमकहाणी. वयातील १५ वर्षांचे अंतर, करिअरच्या सुरुवातीलाच घेतलेला लग्नाचा निर्णय आणि त्यानंतर आयुष्यात आलेली वळणे यामुळे ही प्रेमकथा आजही चर्चेचा विषय ठरते.
डिंपल कापडिया (Dimple Kapadia) यांनी अतिशय कमी वयात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांचे सौंदर्य आणि अभिनय कौशल्य पाहून प्रेक्षक त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. विशेष म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या काळात संपूर्ण बॉलिवूडमध्ये याची मोठी चर्चा झाली होती.

Rajesh Khanna and Dimple Kapadia
डिंपल यांनी ज्यांच्याशी लग्न केले ते होते त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता राजेश खन्ना. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे राजेश खन्ना लोकप्रियतेच्या शिखरावर होते. अनेक तरुणी त्यांच्यावर फिदा होत्या. अशा वेळी राजेश खन्ना आणि डिंपल कापडिया यांच्या लग्नाची बातमी समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
माहितीनुसार, डिंपल आणि राजेश खन्ना यांची पहिली भेट अहमदाबादमधील एका कार्यक्रमात झाली होती. त्या वेळी राजेश खन्ना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि हळूहळू त्याचे रूप प्रेमात बदलले. वयातील मोठे अंतर असूनही त्यांनी आपल्या नात्याला महत्त्व दिले आणि एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. (Dimple Kapadia)
मार्च १९७३ मध्ये दोघांचा विवाह झाला. त्या वेळी डिंपल कापडिया केवळ १६ वर्षांच्या होत्या, तर राजेश खन्ना ३१ वर्षांचे होते. म्हणजेच दोघांमध्ये तब्बल १५ वर्षांचे अंतर होते. लग्नानंतर डिंपल यांनी आपल्या वाढत्या करिअरला काही काळासाठी विराम दिला आणि कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य दिले. (Dimple Kapadia)
या दाम्पत्याला पुढे दोन मुली झाल्या. मोठी मुलगी ट्विंकल खन्ना आणि धाकटी मुलगी रिंकी खन्ना. सुरुवातीला त्यांचे वैवाहिक आयुष्य आनंदात सुरू होते. मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद वाढू लागले. नात्यात दुरावा निर्माण झाला आणि अखेर त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
विशेष बाब म्हणजे डिंपल आणि राजेश खन्ना यांनी कधीही अधिकृत घटस्फोट घेतला नाही. ते वेगळे राहत असले तरी कायदेशीरदृष्ट्या पती-पत्नीच राहिले. वेगळे झाल्यानंतर डिंपल यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली.
दरम्यान, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात राजेश खन्ना यांची प्रकृती खालावली होती. त्या काळात डिंपल कापडिया यांनी त्यांची काळजी घेतली आणि त्यांच्या जवळ राहून साथ दिली. जरी त्यांचे वैवाहिक नाते यशस्वी ठरले नाही, तरी एकमेकांविषयीचा आदर आणि आपुलकी कायम राहिली.
आजही डिंपल कापडिया आणि राजेश खन्ना यांची प्रेमकथा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या प्रेमकथांपैकी एक मानली जाते. प्रेमासाठी घेतलेले धाडसी निर्णय, करिअरला दिलेला विराम आणि नंतर आयुष्यात आलेले चढ-उतार यामुळे ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आणि तितकीच भावनिक ठरते.





