प्योंगयॉंग – परग्रहवासीयांमुळे उत्तर कोरियात करोना महामारीचा फैलाव झाल्याचा अजब दावा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग याने केला आहे. परग्रहवासीयांच्या माध्यमातून उत्तर कोरियामध्ये ही महामारी पसरवण्यामागे दक्षिण कोरिया जबाबदार असल्याचाही अजब आरोप किम जोंगने केला आहे.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर परग्रहवासीयांनी एका फुग्यातून करोनाचे विषाणू उत्तर कोरियाच्या प्रदेशात सोडले असे म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या सीमेवर एका सैनिकाने आणि एक पाच वर्षाच्या लहान मुलीने एका परग्रहवासी सदृश व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर करोनाचा प्रसार झाला असा दावाही आता करण्यात आला आहे.
उत्तर कोरियाचा शेजारी देश असलेल्या दक्षिण कोरियाने किम जोंग यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र उत्तर कोरियातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
सीमेपलीकडून जर काही फुगे केव्हा इतर वस्तू जर आपल्या प्रदेशात आल्यात तर त्याला हात लावू नका आणि काळजी घ्या अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्र करोना महामारीचा फैलाव झाला असताना उत्तर कोरियामध्ये मात्र रुग्ण आढळले नव्हते पण एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोरियामध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली त्यानंतर किमी जोंग ने हा दावा केला आहे.