चीनमध्ये उघ्युर मुस्लिम महिलांवर अत्याचार

हजारो महिलांना ठेवले कॅम्पमध्ये; केसही कापले

पेइचिंग- मुस्लिम बहुसंख्य असलेल्या शिनजियांग प्रांतात पुन्हा एकदा चीनकडून मुस्मिल धर्मियांचा नरसंहार केला जाण्याची शक्‍यता अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी व्यक्त केली आहे.

उघ्युर मुस्मिमांना लाखोंच्या संख्यने डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना संपवण्यासारखे कृत्य चीनकडून केले जात आहे. या कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने महिलाही असून त्यांचे केस कापले जात असल्याचा दावाही ओब्रायन यांनी केला आहे.

उघ्युर मुस्मिलांवर चीन अत्याचार करत असल्याचा आरोप अमेरिकेने पूर्वीही केला होता. त्यासंदर्भातील बातम्या तेथील माध्यमांत प्रसिध्दही झाल्या आहेत. मात्र नरसंहार हा गंभीर शब्द प्रथमच अमेरिकेतील एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने वापरला आहे. एका इन्स्टिट्यूटच्या ऑनलाइन कार्यक्रमातच जाहीरपणे ओब्रायन यांनी हा शब्दप्रयोग केला आहे. याचा शब्दश: अर्थ काढला गेल्यानंतर या प्रकरणाती गांभीर्य समोर आले तर चीनवर अत्यंत कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात अशी शक्‍यताही वर्तवण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार शिनजियांग प्रांतातील तब्बल दहा लाख पेक्षा जास्त मुस्लिमांना डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. येथे या लोकांची कत्तलच केली जात असल्याचा आरोप अनेक मानवाधिकार संघटनांनी केला असून हा मानवतेच्या विरोधातील भयंकर अपराध असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, चीनने मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत. या कॅम्पमध्ये त्या नागरिकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे कट्टरतावादाशी लढण्यास याची मदत होईल असा चीनचा दावा आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांनी आणखी एक आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही काळात अमेरिकेच्या सीमा शुल्क विभागाने चीनमधून आलेली अनेक उत्पादने जप्त केली आहेत. या वस्तूंमध्ये मानवी केसांचा वापर करण्यात आल्याचे आढळून आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. चीन सरकार डिटेंशन कॅम्पमध्ये उघ्युर मुस्लिम महिलांचे मुंडन करत असून त्यांच्या केसांचा या उत्पादनांत वापर केला जातो आहे. हीच उत्पादने अमेरिकेत पाठवली जात आहेत.

या प्रांतात महिलांना नियमित आरोग्य तपासणी करण्यास सांगितले जात असून त्यांची नसबंदीही केली जात आहे. गर्भपाताच्याही लाखो घटना घडल्या असल्याचा दावाही काही अहवालांत करण्यात आला आहे. आम्ही या लोकांना कैद केले नसल्याचा चीनचा दावा असला तरी आठ कोटीच्या आसपास उघ्युरांना येथे कैदेत ठेवण्यात आले आहे. यातील काही लोकांना वारंवार येथे ठेवले जात असल्याचा आरोपही चीनवर होतो आहे.

दरम्यान, उघ्युर मुस्मिलांवर होत असलेल्या या अमानवी अत्याचाराबाबत अद्याप एकाही मुस्लिम राष्ट्राने ब्र शब्द उच्चारला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सौदी अरब, तुर्कस्थान अथवा पाकिस्तान यापैकी कोणाही एकाने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.