मानलं भाव! कोविड रुग्णांनाच्या मदतीसाठी अभिनेत्यानच धरल ऍम्ब्युलन्स स्टेअरिंग हाती

नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. देशात मृत्यूचं तांडवच सुरू असून, अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांपासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगा लागलेल्या दिसत आहेत. करोनाचे थैमान कायम असल्याचेच गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून दिसत आहे. देशात अवघ्या २४ तासांत साडेतीन हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या काळात अनेक अभिनेत्यांनी गरजुंना आर्थिक मदत शक्य त्या सर्व परिंनी  सढळ ह्स्ते मदत केल्याचे दिसून आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Gowda (@actor_arjungowda_92)

यातच सध्या सोशलवर साऊथ अभिनेता अर्जुन गौडा यांनी केलेल्या मदतीचे कौतुक होताना दिसत आहे.  सोशलवर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चक्क अ‍ॅम्बुलन्स ड्रायव्हर बनून रुग्णांना मदत केली आहे. गंभीर रूग्णांना रूग्णालयात पोहाचवून तर प्रसंगी मृतदेह घाटावर पोहोचवून तो माणुसकीचा धर्म जपतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Gowda (@actor_arjungowda_92)

याबाबत अर्जुनने सांगितले,गेल्या काही दिवसांत मी एक डझनावर अधिक कोरोना संक्रमित रूग्णांवर अंतिमसंस्कार केला. मदत हवी असणा-या प्रत्येकापर्यंत पोहोचणे, याच एका हेतूने गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर आहे. लोकांचा धर्म न बघता, माणुसकीच्या नात्याने या कठीण काळात मी लोकांना मदत करतोय. आणखी काही महिने मी ही सेवा देत राहिल. माझ्या लोकांच्या मदतीसाठी मी खारीचा वाटा उचलू शकलो तर मला त्यात आनंद आहे,

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.