पुणे – अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांसाठी खूप काम केले आहे. लॉकडाऊन नंतरही तो प्रवासी मजुरांसाठी काम करतो आहे. त्यामुळे त्याला मजूरांचा मसिहा असे संबोधले जायला लागले आहे. पडद्यावर आतापर्यंत व्हिलनच्या रोलमध्ये दिसणारा सोनू सूद मजूरांसाठी हिरो म्हणून उदयाला आला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कोरोना काळात गरजू नागरिकांना मदत करणारा सोनू सूद आता उत्तराखंडच्या चमोली दुर्घनतेत पिडीत कुटूंबाचा आधार बनला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील जोशीमठ येथील रैनी गावातील डोंगरावरील नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून धौलीगंगा, अलकनंदा आणि ऋषीगंगा या नद्यांना मोठा पूर आला होता. या दुर्घटनेत मोठी जीवितहानीही झाली आहे. या महापुराने नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला.
चमोली दुर्घननेमुळे अस्वस्थ झालेल्या सोनूने टिहरी जिल्ह्यातील दोगी पट्टीच्या एका पिडीत कुटूंबातल्या चार मुलींना दत्तक घेतले आहे. तसेच इतरांनाही मदतीसाठी पुढे यावे, अनेकांना आधार द्यावा असं आवाहनही सोनूने यावेळी नागरिकांना केले आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहिती नुसार, 45 वर्षांचे आलम सिंह विष्णुगड जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित रितविक कंपनीत इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत होते. पुराच्या दिवशी आलम सिंग प्रकल्पातील बोगद्यात कामाला गेले होते, पण दुर्दैवाने त्यांचा ढीगाऱ्यात सापडून मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार असेलेल्या आलम सिंहच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर आहे. आलम यांना लहान चार मुलं आहे. आंचल (14), अंतरा (11), काजल (08) आणि दोन वर्षांची अनन्या या मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा आधार बनत सोनू सूद पुन्हा एकदा देवदूत बनत पुढे आला आहे.
View this post on Instagram
आलम सिंगच्या मृत्यू नंतर त्यांच्या चार मुलांना दत्तक घेण्याचे आश्वासन सोनू सूदने दिले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेकांनी सोनू सूदच्या या कार्याचे जोरदार कौतुक केले आहे.
View this post on Instagram